महाराष्ट्राचं सुवर्णमहोत्सवी वर्ष झोकात साजरं झालं. आणि या साजरीकरणाचं सादरीकरण सर्वच वृत्तपत्रातून पुरवण्याच्या पुरवण्याभरून समोर आलं. सुजाण वाचकांनी १ मेच्या दिवशी एकापेक्षा जास्त मराठी वृत्तपत्रं वाचली असतील अशी अपेक्षा ठेवूनच हा लेख लिहिला जात आहे. सगळ्याच वर्तमानपत्रांनी रकानेच्या रकाने भरून महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीचा आढावा घेतला हो... या आढाव्यात आपले नाटकवाले होते... त्यात आपले पुस्तकवाले होते ( म्हणजे लेखक-कवी-प्रकाशक हो! )... त्यात आपले संगीतवाले होते... त्यात आपले 'श्वास'नंतर (पावट्याची) 'उसळी' घेतलेले चित्रपटवाले होते... यात प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मतं होती, आणि त्या कलाक्षेत्राचा गेल्या ५० वर्षातला आढावा होता. यात नव्हते ते फक्त चित्रकार... ( अपवाद- प्रा.मं.गो.राजाध्यक्षांचा लोकसत्तेतील 'महाराष्ट्र निर्मितीचे चित्रमय दर्शन' हा लेख. पण याही लेखाचा विषयच वेगळा असल्याने त्यात ५० वर्षांच्या समग्रतेचे भान नाही. )
आज भारतीय चित्रकलेचा जेव्हा जागतिक स्तरावर विचार केला जातो तेव्हा वासुदेव गायतोंडे आणि प्रभाकर बरवे या दोन महाराष्ट्रीय चित्रकारांची नावं आदराने घेतली जातात. पण कदाचित वर्तमानपत्रांना त्याची दखल घ्यावीशी वाटली नसेल. गेल्या ५० वर्षातल्या महाराष्ट्रीय चित्रकलेचा आढावा यानिमित्ताने कोणा वर्तमानपत्राला घ्यावासा वाटला नाही यातच एकूणच महाराष्ट्रातील चित्रकला आणि दृश्यकलेविषयीची अनास्था प्रकट होते. याच चित्रकला आणि दृश्यकलेविषयक सौंदर्यदृष्टीच्या अनास्थेचं प्रतिबींब या सा-याच वर्तमानपत्रांच्या एकूण मांडणीतच ( ले-आऊट्समध्ये ) पडलेलं दिसतं. म्हणजे एरवीही ते असतंच पण १ मे ला ते प्रकर्षाने जाणवलं.
मराठी वर्तमानपत्रांच्या दृश्य-मांडणी ( ले-आऊट्स ) बद्दल खरं तर न बोललेलंच बरं. पण निदान १ मे च्या दिवशी तरी काही चांगलं बघायला मिळेल अशी आशा होती. मराठीतल्या चार आघाडीच्या वर्तमानपत्रांची १ मे च्या दिवशीची 'जाडी' पाहता ती आशा पूर्ण होईल अशी दुसरी आशा निर्माण झाली. पण जसं-जसं एकेक पान उलटलं गेलं तसं तसं काय झालं ते सांगण्याचीही इच्छा नाही.
एकीकडे मराठीत अशी 'हालत' असताना 'डीएनए'च्या १ मेच्या अंकाचं पहिलंच पान अगदी सलाम करण्यासारखं होतं. ज्या पद्धतीने त्यांनी शीर्षक देऊन त्या पहिल्याच पानाची मांडणी केली होती, जी व्हाईट स्पेस सोडून त्या फोटोला न्याय दिला होता. आणि हुतात्म्यांची नावं कुठलाही भडकपणा न करता ज्या साधेपणाने दिली होती ते अगदी सलाम करण्याजोगंच होतं. मांडणीतली हीच सौंदर्यदृष्टी त्यांच्या 'महाराष्ट्र@50' या पुरवणीतही अनेक ठिकाणी दिसून येते. यात प्रकाशचित्रांना किती योग्य प्रकारे न्याय देण्यात आला होता. या सगळ्याबद्दल डीएनएच्या संपादकांचे मनःपूर्वक आभार.
याच अपेक्षेने टाईम्स ( OFF ) इंडियावाल्यांकडे पाहिलं तर टाईम्सला १ मेचं काही देणं-घेणं नसल्यासारखाचा त्यांचा अंक होता. त्यांना अजूनही वाटत असावं की त्यांचं वर्तमानपत्र लंडनवरूनच निघतं. आणि ते इथल्या लोकांसाठी नसावंच बहुधा... आणि असलंच तर महाराष्ट्रीय लोकांसाठी नक्कीच नाही. ( एक मे बिक मे काय श्शी... )
खरं तर एखाद्या मराठी वर्तमानपत्राने मांडणीतली सौंदर्यदृष्टी जागृत ठेवून अशी एखादी पुरवणी छापली असती, छायाचित्रांना योग्य न्याय दिला असता तर खरंच मनस्वी आनंद झाला असता. ती पुरवणी खरोखरच संग्राह्य झाली असती. पण तसं घडलं नाही. शब्दांच्या गराड्यात त्या जुन्या प्रकाशचित्रांची गंमत तर कुठच्याकुठे हरवून गेली. कारण एकच योग्य ले-आऊट्स नाही. असं का होतंय कळत नाही? खरं तर याची कारणं ज्यांची त्यांनीच शोधायला हवी. ले-आऊट्सच्या बाबतीतलं हे सौंदर्यभान मराठी वर्तमानपत्रांना यापुढच्या ५० वर्षात यावं अशी शुभेच्छा.
टीकेविना- लोकसत्ता, दि.१ मे २०१० च्या अंकात 'अर्धशतकातील मराठी कविता' हा नीरजा यांचा लेख आहे. यात अथपासून इतिपर्यंत कवी अरुण कोलटकरांचे नाव अरुण कोल्हटकर असे झाले आहे. कवी अरुण कोलटकर स्वतःच्या नावाच्या बाबतीत एवढे दक्ष होते की एकदा एका प्रख्यात कंपनीचं जाहिरातीचं पारितोषिक त्यांनी केवळ कोलटकरऐवजी 'कोल्हटकर' असं नाव पुकारलं गेल्याने नाकारलं. ते म्हणाले की हे पारितोषिक मला मिळालेलंच नाही, कारण अरुण कोल्हटकर या नावाचा पुकारा झालाय आणि माझं नाव अरुण कोलटकर आहे. ही आठवण त्यांचे मित्र श्री रत्नाकर सोहोनी यांच्याशी बातचित करताना एकदा त्यांनी सांगितली होती.

8 comments:
सावंतवाडी येथील बांदेकर कला महाविद्यालयातील प्राध्यापक श्री नरेंद्र विचारे यांनी चिन्हच्या ब्लॉगविषयी इमेलद्वारे नोंदवलेली ही प्रतिक्रिया-
CHINHA chaa blog suru zaalaa, he vaachun aanand zaalaa. Kalaa jagataatil ghadaamodinchi bittam baatami, vichaaraanchi devaan ghevaan aani kalaavantaannaa hakkaache vyaaspith milavun denaaryaa CHINHA chyaa BLOG chyaa pudhachyaa vaatachaalis haardik shubhechchhaa.
-Prof. Narendra Vichare- Principal, B. S. Bandekar College of Fine Art, Sawantwadi.
एकूणच मराठी कलाविषयक संवेदना
गोंधळलेली आहे. यात पु.ल.देशपांडे यांच्या
"मी माझ्यासाठी चित्रकलेचे दोर कापलेले आहेत."
या वाक्याचे contribution असावे असे वाटते.
विशुध्द कलेला समजावून घेण्याचा प्रयत्न
आपल्या इथे फार झाला नाही ही वस्तुस्थिती आहे.
- जयंत जोशी.
Chinha cha blog suru zala he khupch chan zale.Khali nondavaleli arun kolatkara n vishayachi nond jast aawadali.
Agadi nemaka observation!Mi lekhatil Ekun ek matanshi sahamat ahe.
Chinhacya Ashach vatchalila mazya hardik shubhechchha!
- Mukund Taksale
mukund.taksale@gmail.com
चित्रकला ही फावल्या वेळात करण्याची गोष्ट आहे. अशीच शिकवण शालेय आयुष्यात आपले शिक्षक पालक विद्यार्थ्यांना देत असतात. शाळेतील चित्रकला तासांचा उपयोगही बाकीच्या विषयांचा अभ्यासक्रम पुर्ण करण्याकरता केला जातो.याच शालेय वातावरणात वाढलेल्या पत्रकार संपादकांकडून वेगळी अपेक्षा कशी काय करायची ?
Priya Satish,
"Chinha"cha blog he aamachyaa drushtine suchinha aahe! Chitrakalaa,Chitrakaar yawishayee itakya aasthene tu itaki warshe hee chalwal chalawato aahes yacha malaa abhimaan watato!
it is good begining . keep it up. we need interaction between artists and art lovers .this can become a good platform . all d best wishes for Chinha blog
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद,आपल्यासारख्यांच्या प्रतिक्रिया नेहमीच आमचा उत्साह वाढवतात. आमचा ब्लॉग असाच वाचत राहा आणि त्यावर आपली मतं परखडपणे नोंदवा.
पुन्हा एकदा मनस्वी आभार
Post a Comment