Tuesday, May 18, 2010

कलासंचालनालयाचा कारभार!!

नुकताच जेजे अप्लाईड आर्टमध्ये जाण्याचा योग आला. सर्वत्र लाकूड सामानाचा ढीग दिसला. सुतारकाम सुरू होतं. बरेच सेट्स दिसत होते. वाटलं जेजेचं आधुनिकीकरण चाललं असेल. पण चौकशी केल्यावर समजलं की जेजेमध्ये गेले महिनाभर फिल्मचे शुटिंग चालले आहे. रोज रात्री शुटिंग असते. कारण दिवसा कोणाला त्रास होऊ नये. ( केवढी काळजी आहे ना? )
वरती कलासंचालनालयाच्या ऑफिसमध्ये प्रचंड लाईन लागली होती. तिथे बहुधा प्रवेशाचे फॉर्म भरून घेत असावेत, म्हणून पाहिले. पण तसे काही नव्हते. नंतर ध्यानात आले की, आता तंत्रशिक्षणवाल्यांच्या मदतीने प्रवेश तर ऑनलाईन होते. मग ही लाईन कशाला? तर उत्तर मिळाले की इथे प्रवेशासाठीचे बुकलेट विकत मिळते. किंमत फक्त १५० रुपये. म्हटलं, चला एक पुस्तक आपणही घेऊया.
पुस्तक सरकारी आहे. त्याला किंमत असणारच. पण १५० रुपयाचे पुस्तक घेतल्यावर त्याला पावती वगैरे काहीच नाही?? म्हटलं ठीक आहे. किंमत वरती छापली असेलच. पुस्तक चारही बाजूंनी फिरुन पुन्हा पाहिले. पण किंमतीचा आकडा काही कुठे दिसेना? म्हटलं तरीही हरकत नाही. पुस्तकाला नंबरिंग केले असेल. तर महाराजा, ते ही नाही. एकूण काय...तर कलासंचालनालयाचा कारभार!!

प्रा.मंगेश राजाध्यक्ष
( लेखक जेजे स्कूल ऑफ अप्लाईड आर्टचे माजी डीन आहेत )

No comments: