प्रश्न ५ (आणि महत्त्वाचा)
महाराष्ट्र राज्याच्या आणि सर्वच सरकारी धोरणांनुसार अशा स्वरूपाची मोठी मागणी करताना निविदा मागवल्या जातात. या प्रकारणी निविदा मागवल्या गेल्या होत्या काय? ज्याला तुमच्या मराठीत ‘टेंडर’ असे म्हणतात तर ती टेंडर त्यावेळी काढली गेली होती का?
उपप्रश्न अ: नसल्यास का नाही?
उपप्रश्न ब: शासकीय धोरणामध्ये कलासंचालनालयाचा अंतर्भाव करण्यात आलेला नाहीये का? त्याचे टेंडर काढले गेले नाहीये का?
उपप्रश्न क: जेजे स्कूल ऑफ आर्टचा परिसर हा शासकीय धोरणांना आणि नियमांना अपवाद करण्यात आला आहे का?
उपप्रश्न ड: असल्यास तो केव्हापासून?
उपप्रश्न इ: मग कोण कोणती शासकीय धोरणं जेजेच्या परिसरात राबवली जातात हे निदान सांगाल काय?
प्रश्न ६: या एवढ्या शिड्यांचं आता काय करणार? त्या कुठे ठेवणार? का आता जशा जेजे गॅलरीत ठेवल्या आहेत तशाच कायमच्या तिथंच गाडून ठेवणार?
या सा-याला जबाबदारी कोण? त्याच्यावर कारवाई करणार का वगैरे प्रश्न झोंबाडे महाराज तुम्हाला विचारावेत
(जरी मी जेजेत शिकलो असलो तरी) एवढा काही मी मूर्ख नाही किंवा येडझवाही.
मला ज्यांना जे प्रश्न विचारायचे आहेत त्यांना ते प्रश्न मी आयुष्यभर न थकता विचारत राहणार आहे याच जागेवरून, याच ठिकाणावरून, याच पद्धतीने. पाहूया आता कोण थकतं तुम्ही थकता, तुमचं तंत्रशिक्षण खातं थकतं, तुमचे तंत्रशिक्षण सचिव थकतात की तंत्रशिक्षण मंत्री का मी ते! आता अंतिम लढाई सुरू झालेलीच आहे. तर आता होऊन जाऊ द्याच.
बोला हरहर महादेव……. जमशेटजीमहाराज की जय !
आणि हो, जाता जाता या शिड्यांच्या वापरावर एक जालीम उपाय सांगतो. तो करूनच टाका, तुमची सुटका होईल, जेजेची गॅलरीही रिकामी होईल ज्याने या शिड्या मागवल्या तोही सुटेल. या सर्व शिड्या जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांना वाटून टाका आणि त्यांन त्यांचं इंस्टॉलेशन करायला सांगा. हे ही जेजेच्या आवारात तुमच्याच कार्यालयाच्या इमारतीसमोर परिसर पण सुंदर दिसेल.
जेजेत कलाशिक्षणाचं कार्य किती सुंदर पद्धतीने चाललंय त्याचं दर्शनही ?????? विद्यार्थीही खूष होतील, ब-याच दिवसाने काहीतरी क्रिएटीव काम करायला मिळालं म्हणून मास्तरही खूष होतील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि तंत्रशिक्षण खात्याने कलासंचालनालयात काय लायकीचे भैताड लोक भरले आहेत त्याचंही दर्शन जगाल घडेल. या शिड्यांना चांगल शीर्षक द्यायला विसरू मात्र नका. “सीडी ते शिडी”;
माध्यम : अॅल्युमिनियम
किंमत : अमूल्य
सादरकर्ते : सर्वश्री झोंबाडेसाहेव, वाघमारेसाहेब आणि जेजेचे विद्यार्थी.
कशीय आयडिया? आवडली असेल तर जरूर कळवा किंवा कळली नसेल तर जरूर ??? असं म्हणू का? हे तरी तुम्हाला कळेल ना?
सतीश नाईक
ता. क.: इंस्टॉलेशनच्या उद्घाटनाला मला नाही बोलावलं तरी चालेल पण तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपेसाहेबांना जरूर बोलवा. नवे तंत्रशिक्षण सचिव महेश पाठक त्यांनाही बोलवा, सहारियासाहेबांना आणि नागदिवेसाहेबांनाही बोलवायला मात्र विसरू नका हं; आठवणीने बोलवा. त्यांच्याच कारकीर्दीत हे घडलं ना, मग
त्यांना कळवायला नको?
एक प्रश्न : बायदवे मला एक प्रश्न पडलाच मग ‘शिडी’ हा शब्द ही मंडळी कसा लिहित असावीत?
1 comment:
atishayy utkrushta aahe lekh..!!! tumchya pudhil waatchalis anekk shubhechha..!!
Post a Comment